STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

शिवरायांचे गडकिल्ले

शिवरायांचे गडकिल्ले

1 min
13


राजे तुम्ही उभारलेले गडकिल्ले
ढसा ढसा रडत आहे
तिथली दगड आणि माती
भरा भरा कोसळत आहे

हिरोजीने तुमच्या पायाची धूळ पडावी
यासाठी दगडावर नाव कोरले होते
आत्ताची नालायक पिढी बघा
गडाच्या दगडावर प्रेमाची साक्ष गिरवून ठेवते

एक एक गडकिल्ले राखण्यासाठी
मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहले आहे
आता तिथेच प्लास्टिकच्या बाटल्या,
सिगरेट, कचरा माणूस सर्रास टाकत आहे

शिवरायांचे जीव की प्राण होते
एके काळी गडकिल्ले
आता रिल्स, फोटोशूट, नाचगाना,
मौजमजा शिवाय काहिच नाही उरले
 
गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था
काळजीने मोहीम घेत असतात
आजच्या घडीला हे ऐतिहासिक वास्तू
जपण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात

पर्यटन स्थळ म्हणून जाऊ नका
शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले अथवा
तिथली माती, दगड, झाडे ,मंदिरे , तोफेवर
आपले माथे टेकून राजेंना क्षणभर आठवा

उद्याच्या येणाऱ्या पिढीला
फक्त लिखित इतिहास नसावे
स्वराज्याचे साक्ष असणारे
शिवरायांचे गडकिल्लेही असावे 


Rate this content
Log in