स्वराज्याची शपथ
स्वराज्याची शपथ
रायरेश्वर मंदिरात..
मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना मांडली
याच रायरेश्वर मंदिरात..
आपले शिवराय फक्त सोळा वर्षाचे असताना स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली
याच रायरेश्वर मंदिरात
आपल्या रक्ताचा अभिषेक करून गनिमांची झोप उडवली
याच रायरेश्वर मंदिरात..
मावले आणि शिवरायांमध्ये दुश्मनांना धूळ चारण्यासाठी शंभर वाघांची ताकद आली
याच रायरेश्वर मंदिरात..
महादेवाचा आशीर्वाद घेऊन तलवारीच्या धारेने परकीय सत्तेला जेरीस आणून सलो की पळो केले
याच रायरेश्वर मंदिरात..
कपाली भस्म फासून जय भवानी,हर हर महादेव ची गर्जना केली
याच रायरेश्वर मंदिरात
महादेवाला वंदन करून शिवरायांनी सम्पूर्ण आयुष्य जनकल्याण साठी अर्पण केली
याच रायरेश्वर मंदिरात..
एक एक मावळे जमा करून भगव्या झेंड्याची धमक स्वराज्याच्या शत्रूला दाखवली
याच रायरेश्वर मंदिरात..
छत्रपती शहाजी राजे, राजमाता जिजाऊ माता यांचे स्वराज्याच्या स्वप्नांची पहाट झाली
