STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

तिला मिठीत घेतच होतो

तिला मिठीत घेतच होतो

1 min
4

तिला मिठीत घेतच होतो 

आणि अचानक पावसाची सर आली

पत्र्या मधून पाणी टपकायला लागले 

ह्या मेल्याला आत्ताच मरी आली 


तिला मिठीत घेतच होतो

ती Instagram बघायला लागली

गप्प बसा जरा अहो 

माझी ह्या मोबाईल ने काशी केली


तिला मिठीत घेतच होतो

शेजारच्याने दरवाजा ठक ठक केला 

पाणी आले चाळीतले उठा

मी मनातल्यानात पुटपुटलो उठवणाऱ्याला 


तिला मिठीत घेतच होतो

विजेने खोळंबा केला अचानक 

पंखा बंद झाला ना, मग काय 

दोघांनी डास मारले फटाक फटाक 


तिला मिठीत घेतच होतो

आणि आमचे छोटे चिरंजीव उठले

ट्या ट्या रडत आईकडे गेले

मी बोललो बाबू बुवा येईल झोप 

ते ऐकून आणखी रडले 


तिला मिठीत घेतच होतो

सकाळचे सहा वाजले होते

अहो डब्बा बनवते जेवणाचा आता

नको सुट्टी घेतो बोलल्यावर ती गाढ झोपते


Rate this content
Log in