दिवाळी
दिवाळी
1 min
146
दिवाळी
दिवाळी म्हणजे
नवीन वर्षाची सुरुवात
एक सोनेरी पहाट
लखलखणारी रात
दिवाळी म्हणजे
घरोघरी फराळ
चकल्या, करंज्या, चिवडा
मस्त चहा बरोबर सकाळ
दिवाळी म्हणजे
पणती दारात
आकाश कंदील
सुरेख रांगोळी अंगणात
दिवाळी म्हणजे
कपडे नवीन
नोकरीचा बोनस
आनंदाचे क्षण
दिवाळी म्हणजे
फटाक्यांचा आवाज
लवंगी बार, फूल बाजे
वाजवण्याची मौजच मौज
दिवाळी म्हणजे
फिरण्याचे दिवस
नातेवाईकांना भेटण्याची वेळ
अशी दिवाळी असतेच खास
स्वप्नील चंद्रकांत जांभळे
दापोली
मो.९६१९७७४६५६
