बापू
बापू
बापू
विसरू कसे मी
थोर तुमचे उपकार
पांग फेडू कसे बापू
माझ्या जीवनाचे शिल्पकार
वाईट परिस्थितीत
तुम्हीच आधार दिलात
पोटच्या पोरासारखी
लहानाचे मोठे केलात
लहानपणी आईवडीलांचे
छत्र हरवले
मयेकर वयनी आणि बापू
पोटच्या गोळया सारखे मला सांभाळले
दगडालाही पाझर फुटेल
एवढे प्रेम केले
काळजीने पोट भरून
सन्मानाने जगायला शिकवले
शिक्षण नशिबी नव्हते
दार तुम्ही उघडले
आयुष्याचे सोने झाले
फक्त फक्त तुमच्यामुले
लहानपणी झाडासारखी
आम्हाला सावली दिलीत
पायातली चप्पल झिजवून
शिस्तीने मोठी केलीत
शब्द अपुरे पडतील
तुमचे गुणगान गायला
आठवण येतं राहील
शेवटपर्यंत क्षणा क्षणाला
