गरमा गरम कांदा भजी
गरमा गरम कांदा भजी
पाऊस पण थांबता थांबत नव्हते
घरी जायला थोडे उशीर झाले होते
भूख मरणाची लागली होती
खायची घाई झाली होती
खमंग रस्त्याभर पसरले होते
एक काका भजी तळत होते
पोटात कावळे ओरडत होते
तोंडाला पाणी सुटले होते
खायला गर्दी मरणाची
त्यात रिमझिम पावसाची
कांदा ,बेसन ,मीठ ,हळद, मसाला मिसळून
भजी गरम कढईत अलगद देत होते सोडून
एक प्लेट भजी ऑर्डर केली
ताव मारायला सुरवात केली
दोन तीन हिरव्या मिरच्या, चटणी बरोबर
कुरकुरीत भजी रगडली
पोटभर
सोबत एक कटिंग चहा बनतोच
हाच तर जगण्याचा खरा आनंदच
तेवढ्यात आले घरातून
फोन
अहो गरमा गरम भजी या घेऊन
