STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Others

बाप

बाप

1 min
244

बाप


शंभर रुपयाची चप्पल घालून

हजार रुपयाचे सुट बुट 

विकत घेऊन देतो तो बाप असतो


फाटलेले कपडे स्वतः शिऊन घालून 

नवे करकरीत कपडे

खरेदी करून देतो तो बाप असतो


भूख लागली की वडापाव खाऊन

फाईव स्टार मधला पिझ्झा बर्गरचा घास 

भरवतो तो बाप असतो


मराठी शाळेत शिक्षण घेऊन 

महागड्या इंग्रजी शाळेत 

प्रवेश घेऊन देतो तो बाप असतो


स्वतः झोपडपट्टीत दिवस काढून 

आलिशान वन बी एच के फ्लॅट

राहण्यासाठी विकत घेतो तो बाप असतो


कोणासमोर कधीच न झुकणारा

पण अपमान, दुःख सहन

करून घेतो तो बाप असतो


अडी अडचणी कितीही असूद्या

सदा हसरा चेहरा

समोर ठेवतो तो बाप असतो


उन्हातान्हात काम करून

दमून भागून घरी आल्यावर

दमलेल्या खांद्याला घोडा करून 

खेळवतो तो बाप असतो 



Rate this content
Log in