Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

4  

Sangita Pawar

Inspirational

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण

1 min
394


आला आला श्रावण

हिरवळ पसरे चोहीकडे

माती न्हाती- धुती होती

रिमझिम पाऊस पडे ||


आला श्रावण श्रावण

नाग पंचमीचा सन

करू वारुळ पुजन

निसर्गाचे संवर्धन ||


आला श्रावण श्रावण

पिकं डोले आनंदान

सरीवरी सरी येती

ओली -चिंब होती रान ||


आला श्रावण श्रावण

हर्ष उल्हासित मन

नव्या नवरीला येते

माहेराची आठवण |


आला श्रावण श्रावण

रक्षाबंधनाचा सन

राखी भावाला बांधते

तोचि करेल रक्षण ||


आला आला श्रावण

इंद्रधनुष्याची कमान

ऊन पावसाचा खेळ

कधी दिसे सूर्यकिरण ||


आला आला श्रावण

सांज सकाळ झाडावर

 किलबिल पाखरांची

गवत डोले बांधावर ||


आला श्रावण श्रावण

मुले खेळे डबक्यात

पाण्यावर कागदी होडी

मजा करी आनंदात ||


आला श्रावण श्रावण

वृत्तवैकल्य घेऊन

शाकाहारी जेवण

स्वास्थ्यासाठी हो छान ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational