आपली जबाबदारी
आपली जबाबदारी
हाच तो दिवस मिळाले भारताला स्वातंत्र्य,
75 वर्षे झाली गेले आपले पारतंत्र्य..
स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी दिले जीवन दान, आहोती
असे लाखो लोक गेले पण मिळाली नाही माहिती
अशा लोकांना मनापासून आदरपुर्वक प्रणाम
हुतात्मा झालेल्या बंधू-भगिनींना मिळणार नाही प्रमाण
स्वराज्य माझा हक्क आहे,भारत छोडो झाल्या गर्जना,
तुम मुझे खून दो, ऐकुन नमते घ्यावे लागले इंग्रजांना
शांत सागर खवळला तसा भारत आता खवळला
जमिनीवर हात टेकून शेवटी इंग्रजांचा सूर्य मावळला
घुसणार नाही दुश्मन घेऊ सगळेच आपण खबरदारी
भारताला महासत्ताक बनविणे आपलीच आहे जबाबदारी
झाल्या चुका परत नाही गाफील राहून चालणार नाही
लक्ष ठेऊ चौफेर दुश्मन कोणीही असो सोडणार नाही
देशासाठी आपापसातले वैर विसरून जाऊ
जगावर राज्य करताना भारताला आपण पाहू
जगावर राज्य करताना भारताला आपण सगळेच पाहू
