मला आता परत पाहिजे
मला आता परत पाहिजे
जोराचा पाऊस येऊन गेल्यावर
डोंगर माथ्यावर दिसणाऱ्या चंदेरी तारा
निरभ्र आकाश स्वच्छ प्रकाश
हवेत गारवा हवाहवासा तो वारा
असेच मला वाटते काही जे
लहानपणी पाहिलेले मला आता परत पाहिजे
डोंगर हिरव्या मखमली वरती
स्वच्छ हवेत फुलपाखरे फिरती
येता झुळूक वाऱ्याची, रानफुले डोलती
पक्षांचा चिव चिवट झाडावर करती
असेच मला वाटते काही जे
लहानपणी पाहिलेले मला आता परत पाहिजे
टेकडीच्या माथ्याला गुरे, वासरे,
गाई म्हशी स्वच्छंद चरती
प्राण्यांचे मालक एकत्र येऊनी
टेकडीच्या पायथ्याला गप्पा गोष्टी करती
असेच मला वाटते काही जे
लहानपणी पाहिलेले मला आता परत पाहिजे
सणावारांना सर्व मुले एकत्र जमुनी
एकमेकांच्या घरी दारी फिरती
सगळे कसे नवीन कपडे घालूनी
आनंदोत्सव मौज मजा करती
असेच मला वाटते काही जे
लहानपणी पाहिलेले मला आता परत पाहिजे
मला आता परत पाहिजे...
