एस एस सी बॅच
एस एस सी बॅच
आपली बॅच महान
गोल्डन बॅच महान
वेगवेगळ्या परिस्थितीतून एकत्र आलेला,
शिक्षणाच्या गंगेत तो नहालेला
येथे कोणी नाही मोठा लहान
आपली बॅच महान
गोल्डन बॅच महान
दहावीनंतर चांगल्या
क्षेत्रात नाव कमावले
आपापल्या कुवतीप्रमाणे
ते सगळेच धावले
तरी लागत नाही भुक तहान
आपली बॅच महान
गोल्डन बॅच महान
कोणी शेतकरी, कोणी शिक्षक,
कोणी मेजर तर कोणी मॅनेजर
कोणी गृहिणी, कोणी उद्योगपती
पण नाही कोणाची ही अधोगती
तरी येथे कोणी नाही मोठा लहान
आपली बॅच महान
गोल्डन बॅच महान
असेच एकत्र येत राहू
एकमेकांकडे पाहत राहू
प्रत्येकाला मग साथ देऊ
१९९३ ची बॅच पहाता पडेल बुध्दी गहाण
आपली बॅच महान
गोल्डन बॅच महान
