श्री म्हाळसाकांत पर्यटन
श्री म्हाळसाकांत पर्यटन
प्रथम दर्शनी दिसते हिरवीगार झाडी
डोळ्यासमोर पार्किंग, लावायला गाडी
स्वतः भोवती फिरून चिंचेची झाडे पहा
तोवर येईल मग बघा आपल्या हाती चहा
नवप्रेमींसाठी आहे एकांत वास
फॅमिली साठी तर मज्जा खास
गेम्स आहेत इनडोअर,आउट डोअर
आले येथे एकदा की होत नाही कसलंच बोर
स्वच्छ, निर्मळ मिळते थंड येथे हवा
गप्पा मारताना सहज दिसतो मोरांचा थवा
येथील निसर्गाला नाही कशाचीच उपमा
अर्ध्या तासात येतो हाती नाश्ता पोहे-उपमा
सर्व कामगार, मालक सगळेच माळकरी
पांडुरंगाचे मंदिर दारी, आहेत वारकरी
चिंचेच्या झाडाखाली बसून
शेताकडे पाहत मन शांत होऊन जातं
धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात
खवळलेले समुद्री पाणी नितळ होऊन जातं
मुलांसाठी ट्रॅक्टरच्या मागे लावली रेल गाडी
मोठी माणसे ही बसा चला करु मजा थोडी
दुपारी जेवणात स्पेशल मासवडी किंवा पुरणपोळी
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत विसराल दुपारची गोळी
मग करा थोडा आता थंड सावलीला आराम
रोजच्या असणाऱ्या टेन्शन ला करा राम राम
रोपवे, म्युझिक फौउंटन, स्विमिंग पूल
मजा करा लहानथोर असूदे छोटं मुल
वेळ झाली आता खरी मोर एकत्र जमण्याची
जाऊ ट्रॅक्टर सफारीला हाऊस भारी मोर पाहण्याची
जाता जाता आता शेवटचा चहा घेऊ
म्हाळसाकांत पर्यटनाला पुन्हा एकदा भेट देऊ
