नशिबाचा खेळ
नशिबाचा खेळ
कितीही हात पाय हलवा
जोरात तुम्ही नखवा वलवा
शेवटी चालतो नशिबाचा खेळ
घालतो तुमच्या जगण्याचा मेळ
कितीही कष्ट करा
कितीही उष्टी काढा
शेवटी चालतो नशिबाचा खेळ
जगण्याला देऊन अन्न घालीन तो मेळ
कितीही पैसा असो
कितीही दारिद्र्य असो
शेवटी चालतो नशिबाचा खेळ
चांगलं आरोग्य देऊन घालीन तो मेळ
कितीही पिकवा वाटाणा
हरभऱ्याचा करा फुटाणा
शेवटी चालतो नशिबाचा खेळ
बाजारभाव देऊन घालीन तो मेळ
कितीही गडबड असू देत
कुणीही बडबड करू देत
शेवटी चालतो नशिबाचा खेळ
जेव्हा तुमचा बसेल ट्राफिकशी मेळ
कितीही चांगलं वागा
करा किंवा करू नका त्रागा
शेवटी चालतो नशिबाचा खेळ
समोरच्याबरोबर होईल तुमचा मेळ
आपल्या कर्मावरच नशीब असतं
नशिबात असेल तर सगळंच मस्त
शेवटी चालतो नशिबाचा खेळ
नाहीतर होते आयुष्याची भेळ
नशिबच फुटकं तर होते आयुष्याची भेळ
