पैसा
पैसा
1 min
152
पैसा मान देतो
नवीन काही करण्या हिम्मत देतो
धनधान्य, ऐश्वर्या देतो
पैसा, पैसा देतो
जिंकण्याची जिद्द देतो
संयम देतो, नवीन उमेद देतो
मित्र-मैत्रिणी देतो
खूप सारी ओळख देतो
जवळचे नातेवाईक देतो
पैसा सगळं काही करतो
जीवनाची शांती घेतो
मनसोक्त जगणं हिरावून घेतो
बालीसपणा, खट्याळपणा घेतो
एकांत घेतो, आनंद घेतो
आपली माणसं दूर करतो
जगण्याला एक सीमा देतो
व्यक्त होण्यालाही बंधन देतो
तरीसुद्धा माणसाला पैसा हवा असतो
अखेरच्या श्वासापर्यंत पैसा हवा असतो
