महिला
महिला
हीच ती महिला महान
जन्म दिला प्रभू राम, कृष्णाला
हिनेच जन्मा घातले
कंस मामा आणि रावणाला
आपलं काम करण्यात चोख
नेहमीच दिसते महिला
समाज लिहिणा-याला सोडतो
जबाबदार धरतो वहिला
प्रत्येक लहान थोर माणसांना
हिनेच वाढवले निस्वार्थाने
माऊली ती विश्वाची
शिकविले हे परमार्थाने
जिच्या हाती दोरी
ती जगास उध्दारी
पण आजही दिसते ती
फिरताना दारोदारी
प्रेम मनात भरलेले
उदरी असे गर्भाशय
कुणी काहीही करो
पहिला तिच्या वरच संशय
अडचणीत मात करण्या हिम्मत,
डोळ्यात भरते टचकन पाणी
हीच असते दुर्गामाता
अप्तेष्टांत मात्र केविलवाणी
प्रत्येक व्यक्तीसाठी हृदयात
तिच्या वेगळीच जागा
हीच फुलवू शकते
दुष्काळी प्रेम रूपी बागा
असली जरी आपली
पुरुषप्रधान संस्कृती
महिलांमुळेच टिकून आहे
भारतीय संस्कृती
महिलांमुळेच टिकून आहे
आपली संस्कृत....
