शेतकरी
शेतकरी
यालाच काळजी साऱ्या जगाची
तरी म्हणतात रीत नाही जगण्याची
घरातील मोठी माणसं असतात शेतावर
जोमाने पीक वाढत असतं खतावर
पण पाण्याची शाश्वती काही नाही
पावसाचा कसलाच नेम नाही
थांबला तर घशाला कोरड येईल
आला तर सारं खरडून वाहून जाईल
तरी हा सणवाराला हजर असतो
वारीत सगळ्यां आधी पळताना दिसतो
दरवर्षी हा पिकाचा खेळत असतो जुगार
मातीतून सोनं पिकवतो खरा हा जादूगार
घासातील देतो दुसऱ्यास आपला घास
नाहीच काही जमलं तर लावतो गळ्याला फास
पिकाला जगवतो मुला पेक्षा जास्त जपून
विकताना येतो माती मोल भावात खपवून
माल जरी स्वतःचा तरी भाव नाही हातात
स्वतःपेक्षा व्यापारीच जादा मलई खातात
मिळेल का कधी कष्टाच्या घामाची किंमत?
शेतकऱ्याचा जागेवर काम करण्याची आहे कोणाची हिम्मत
या जागेवर काम करण्याची करेल का कोणी हिम्मत ...
