Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Vaidya

Inspirational

4.1  

Sandhya Vaidya

Inspirational

मैत्रीचा पाऊस

मैत्रीचा पाऊस

1 min
366


पावसा तु आलास

अन् ओलावा आला जगण्यात 

शुष्क झालेली मने,

अन् वृक्ष वेलीसह माणसे

 विस्कळीत जीवने

फुलाफळांनी बहरली

सुखस्वप्नांची झाली सुरुवात 

चाललो आम्ही आता

 समाधानाकडे संघर्षातून 

झोपडीतून बंगल्याकडे

अंधारातून प्रकाशाला कवेत घेता

बस् पाय लागले घसरायला

 मने डबडबलीत चिखलाने

 घोंघावत आले द्वेषाचे मोहोळ

दंश दंशाने सगळे घायाळ,

क्रोधाच्या अग्नीत होरपळले  

 द्वेषाच्या इमारतीतील मुले

चढलीत मजल्यावर मजले ,

महापुरात त्या आसक्तीच्या

काळोखाचा झाला कल्लोळ

अज्ञानात चाचपडतोय

दिशाहीन हा समाज 

प्रज्ञा ,शील, समाधीचा सुगंध 

चाखलाच नाही कधी

अंधश्रद्धेच्या दलदलीतील

मोहाचा दर्प 

कसरीचा किडा जणू

कुरतडतोय काळजाला

मखमली दुःखात

अडकून टाहो फोडतात 

मनःशांती साठी 

आठवतो मग बुद्ध !!

पावसापेक्षा शांत शीतल 

ओलाव्याने ओतप्रोत

मैत्रीचा पाऊसच पाऊस !!!

चिखलविरहित!!!

द्वेषाचे भ्रमरे विरघळून 

झुळझुळ झरा प्रेमाचा

फुलवून बाग बगीचे समतेचे

 मोदमय बंधुत्वाचे येती पिके 

तो हवाहवासा मंगल पाऊस !!

नतमस्तक होऊन जाईल 

कण न कण धरतीचा...

भिजवित परिसर सारा

 निचरा अत्याचार वृत्तीचा,

अमानुषपणे येणारे चित्कार 

शांत करणारा पाऊस!!!

अन ती माती विश्वासाने

करेल जवळ लेकरांना 

भेदभाव विरहित !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational