STORYMIRROR

Meena Khond

Others

3  

Meena Khond

Others

वृक्षवल्ली

वृक्षवल्ली

1 min
228

वृक्षवल्ली पान पान मानवाचा श्वास आहे.

वृक्षांभर अवलंबून मानवाचा घास आहे.


घनदाट वृक्षाखाली शीतल छाया आहे 

प्राण्यांवर सर्व वृक्षवल्लींची माया आहे.


प्रदुषित वायू पिण्याचे काम आगळे आहे

अन्नदाता वृक्ष मानवाचे नाते निराळे आहे 


अश्वस्थ वृक्षराज पक्षांचा निवास आहे

ऋषीतुल्य वृक्षात नारायणाचा वास आहे


परोपकारी वृक्ष आदर्श जीवन आहे

जीवनात स्वावलंबन तत्वाचे पालन आहे 


स्थितप्रज्ञ ,फलत्याग हे जीवन आहे.

गीता ज्ञानाचे साक्षात जीवन दर्शन आहे.


नका तोडू झाडं मानवाला संदेश आहे

झाडे लावा झाडे जगवा हा परिवेश आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन