शुभ दीपावली
शुभ दीपावली
लक्ष लक्ष दीप दीपावलीचे
दीपगान गाती स्नेहल प्रीतीचे
सप्त सूरांच्या सुरावटीतून
सप्त रंग सोनेरी प्रकाशाचे
तिमिरातून चैतन्याचे
दीपावलीच्या आनंदाचे ....
झुळझुळणारा शीतल वारा
आकाशी लखलखती चांदणी
लुकलुकत्या सुवर्ण दीपकळ्या
अनंत दीप पाजळले अंगणी
सुस्वागतम् उत्सवाचे
दीपावलीच्या आनंदाचे ...
पहाटेचा मधूर नादस्वर ओंकार
आमोद अनुपम आत्मानंद महान
सुमधूर सुबोल दीपावली मिलन
सानंद घन लाभले समाधान
प्रेमाशिष शुभेच्छांचे
दीपावलीच्या आनंदाचे...
सुवर्ण प्रकाश स्वर्ण वैभव
लक्ष लक्ष दीप लखलखती.
दीपावलीला लक्ष्मी अवतरे
अंबरातून अविरत अवनीवरती.
सुखसंपन्न समृद्धीचे
दीपावलीच्या आनंदाचे....
