हुंडा
हुंडा
ठरावं मुलीचं लग्न बापाला मनोमन वाटलं,
इतके दिवस जपलेलं नातं दुरावेल, दुःख मनी दाटलं
एका सर्वगुणसंपन्न वराचा घ्यायला लागला तो शोध,
मुलीला ठेवील सुखात कायम असा हवा सुबोध
वधूवरांची पसंती झाल्यावर बोलणी सुरु झाली,
सासरकडच्या मंडळींनी एकेक मागणी वाढवत नेली
इतक्या मोठ्या घरात मुलगी देताय तर थोडा मानापान करा,
मुलीला लागेल सुख या विचारानं त्यानं नकळत होकार भरला खरा
मुलीला मुलगा आवडला हे महत्वाचं, हुंडा तर आपण देऊन टाकू,
पाच वर्षांची कमाई आहेच, लागलं तर शेतजमिनीचा तुकडाही विकू
हुंडा दिल्यावरही शेवटी लग्नात त्यांनी पाहिलं अडून,
मंडपात पोरगी असल्याने त्यानं सगळं केलं जीव तोडून
लग्नानंतर मुलाला घ्यायची गाडी, तिला म्हणाला माहेरून पैसे आण,
हुंडाच दिला कसाबसा जिवाचं करुन रान
वाढतच गेला तिला सासरी होणारा जाच आणि छळ,
बापापर्यंत नकळत आली पोरीच्या दुःखाची झळ
म्हशीला होत नाहीत जड स्वतःची शिंगं
पण आता उघडकीस आणणार मी तुमचं बिंग
धुळीला मिळवणार मी तुमची अन् तुमच्यासारख्यांची प्रतिष्ठा,
वधू अन् वधूपित्याने केली याच कार्यासाठी पराकाष्ठा
दोघांनी केलंय बंड, दिला कितीतरी जणींना मिळवून न्याय,
नात्याला गरज नसते स्वार्थाची, प्रत्येक गोष्टीला असतो उपाय
