श्रावण मास
श्रावण मास
श्रावणात मृग नक्षत्राचा आरंभ
ढगाळ वातावरण मन प्रसन्न
निसर्गाचे सौंदर्य फुलले
आकाशी सप्तरंगी इंद्रधनुष्य
मन मोहरुन जाई
बागेत फुलांचा दरवळ पसरला
पिसारा फुलवून मोर नाचला
मेघराजाच्या श्रावण सरींचा वर्षाव झाला
धरणीवरती सारा हिरवा शालू पसरला
रक्षाबंधन, गणपती, गौरीपुजन
श्रावण सणांची रेलचेल घेऊन आला
प्रसन्न आणि आनंदी श्रावणी सोमवार सजतो
आला श्रावण आला म्हणत मन मोहरुन जातो
हिरव्या वाटा, उसळत्या लाटा, इंद्रधनुष्याचा काठ
श्रावणाचा थाट
हिरवाई लेवुन आला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण
गीत सुरांत गुंफला श्रावण
नभ गगनांत उतरला श्रावण
रानावनात बहरला श्रावण
रंग रंगात रंगला श्रावण
झुला झुल्यावर खेळला श्रावण
आनंद, हर्षात नाचला श्रावण
मनामनात खुलला श्रावण
आला श्रावण, आला श्रावण
