प्रेम
प्रेम
प्रेम हे फक्त प्रेम असतं
निर्व्याज, निरपेक्ष असतं
त्याला ना कुठली भाषा असते
ना त्यात कसला भेदभाव असतो
त्याला ना वयाच बंधन असतं
ना त्याला रंगरूप, आकार असतो
त्यात तुझ माझं अस काहीच नसतं
दोन हृदयाचे ते सुंदर नातं असतं
शब्दावाचून कळणारं ते गुपित असतं
एकमेकांशी नजरेतूनच बोलता येतं
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनुभवता येतं
अन् मनाच्या कुपीत अलगद जपून ठेवता येतं