प्रेम
प्रेम
तू दिसता सामोरी मजला
हर्ष होत असे मानसी कसला
मला न कळे हे गुपित मनाचे
ना ठाऊक मला भाव हृदयाचे
पण स्मरता तुजला जेव्हा ही
मन माझे भाव विभोर होई
बघण्या तुला पुन्हा पुन्हा
हे नेत्र माझे अधीर होई
हीच असे का प्रीत हृदयाची
साक्ष देत असे मधुर प्रेमाची