माझा लढा
माझा लढा
जन्मल्यापासून मी हेच ऐकले आहे,
तू एक स्त्री जात असून अबला आहे
नको ओलांडू कधी तो उंबरठा घराचा,
होशील भक्ष्य तू त्या भेदणाऱ्या नजरेचा
नाही पेलणार तुला कुठलेही धाडस,
नको जाऊ पुरुषी अहंकाराच्या वाटेस
खूप झाला हा स्त्रीपुरुष भेदभाव आता
या विरुद्ध माझे बंड मी पुकरणार आहे
घेऊन हाती शिक्षणाचे बलशाली शस्त्र,
या असमानतेशी दोन हात करणार आहे
या दिव्यातून नक्की पार पडणार आहे
माझा लढा मी हमखास लढणार आहे
हा स्त्रीपुरुष भेदभाव मी मोडणार आहे