पोटाची खळगी
पोटाची खळगी
पोटासाठी वणवण भटकणाऱ्या
त्या असंख्य चेहऱ्यांना पाहिलय कधी?
त्यांना चिंता असते ती केवळ दोन
वेळेच्या चटणी अन् भाकरीची
पूर्ण होताच त्या दिसाची क्षुधा शांती
घेती मग ते क्षणभर विश्रांती
अन् परत नवा दिवस उजाडताच
सुरू होऊ त्यांचे अव्याहत चक्र
पोटाची खळगी भरता भरता
उभे आयुष्य ते पणाला लावत
अन् शेवटी त्यांच्या संगे संपत
त्यांचे चाललेले हे जीवन युद्ध..