ती
ती
अंगणातल्या पारिजातकाची दरवळ ती
बहरलेल्या मोगऱ्याचा परिमळ ती
देवघरातील दिव्याची शांत ज्योत ती
मातृत्वाच्या सुंदर अनुभूतीची स्त्रोत ती
घरातील प्रत्येक वस्तूचे अस्तित्व ती
वाटूनी स्वतःला सर्वांत तिच्यात पूर्ण ती
ती पुरविते घरातील प्रत्येकाचा हट्ट
ती ठेवते प्रत्येक नात्याची वीण घट्ट
तिच्यामुळेच असते घराला घरपण
घरासाठी करते ती आयुष्य अर्पण
तिलाही हवे असते प्रेम हे विसरून
ती करते सर्वांवर प्रेमाची पखरण
कधीतरी तिला कुणी समजेल का?
तिच्या हृदयाची आर्त हाक कुणा कळेल का, कुणा कळेल का?