STORYMIRROR

Pranjali Lele

Inspirational

3  

Pranjali Lele

Inspirational

गुरू

गुरू

1 min
277

तूच ब्रम्हा, विष्णू, महेश, तूच दैवत एक,

करिता एक तुज वंदन पावे तिन्ही लोक.

तूच ज्ञानसागर, कैवल्याचा पुतळा तूची,

प्रगटला या भूतला तारण्या भक्तासी.

तुझिया चरणी जो जाई शरण,

होई त्याला दुःखाचे विस्मरण.

करिता तुझी प्रेमाने आळवण,

नित्य होई ज्ञानामृत रसपान.

तुझा महिमा अगाध अपरंपार,

आम्ही पामर तूच आम्हासी तार.

करुनी वंदन भक्तवत्सल गुरुरायाला,

आज करू साजरा गुरुपौर्णिमा सोहळा🙏🌺


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational