सुधा मूर्ती
सुधा मूर्ती
साधी राहणी उच्च विचार
ज्ञानाच्या तेजाने पसरे कीर्ती
भारत मातेला लागली कन्या
नाव महान तिचे सुधा मूर्ती ||
भारती विद्यापीठाची पदवी घेऊन
पहिली इंजिनियर कन्या झाली
इन्फोसिस संस्थेच्याआहेत विश्वस्त
नारायणमूर्ती यांची स्फूर्ती झाली ||
सुप्रसिद्ध लेखिका, कार्यकर्त्या
प्रभावी अशी मनधरणी लेखणी
साहित्यक्षेत्रातील असे योगदान
याहुनी कोणीच नाही देखणी ||
ओजस्विनी राजलक्ष्मी पुरस्कृत
पद्मश्रीने त्यांना सन्मानीत केले
पुरुषाप्रमाणे स्त्री सक्षम असते
असे सुधामूर्तींनी दाखवून दिले ||
लक्ष्मी संपन्न होत्या दानवती
शालिनी सात्विक सरस्वती
सकलजनांशी जोडून नाते
स्त्रियांसाठी खऱ्या प्रेरणा ठरती ||
