*प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व**(शांता शेळके)*
*प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व**(शांता शेळके)*
गुंफणीया शब्दमाळा अमरगीते निर्मिली,
लोकप्रिय साहित्यिका महाराष्ट्राला लाभली!!
साकारिले जिवनाला सुमधुर काव्यातूनी,
सुसंगीत काव्य फुले, फुलविली स्वरातूनी..
भक्तीगीते भावगीते गोड स्वरानी लिहिली!!
मधूर त्या गीतासवे अंभग ओव्या लिहूनी,
संस्कारिले बालमने बालगीते रेखाटूनी..
"पप्पा सांगा" अशी गीते जनमनात रुजली!!
दिले सुस्वर संगीत मराठी चित्रपटांना,
मिळे आनंद मनास मधुर गीते गातांना..
स्फुरतीतून चित्रगीते नवकाव्याने स्फुरली!!
स्वरबद्ध काव्य त्यांची मनामनात ठासली,
कित्येक स्वरातूनी अमर गीते ती जाहली..
मराठी सारस्वतांनी सरस्वतीच मानिली!!
