*दीपावली आली*(अष्टाक्षरी)
*दीपावली आली*(अष्टाक्षरी)
सण दिवाळीचा आला,
जनतेच्या आवडीचा..
पंचपक्वान्नेचा राजा,
दारी सडा रांगोळीचा!
पाच दिवसांचा सण,
धनत्रयोदशी छान..
धन पुजती मानानं,
दीप लावून सृजन!
अंगी लावून उटणे,
करू अभ्यंगस्नानाला..
देऊ असुराचा बळी,
पायी तुडवून त्याला!
येई पाडवा चवथा,
भाऊबीज शेवटला..
सण महान असती,
मांगल्याच्या भेटीतला!
दारी दिव्यांची आरास,
शोभे आकाश कंदील
भुईनळ्या सुरसुरे,
दिसे मोहक आभाळ!
खूप धमाल करून,
दिन जाती आनंदान..
अशा मधूर सणाचे,
होई सारखे स्मरण!
