स्वरसम्राज्ञी लतादीदी
स्वरसम्राज्ञी लतादीदी
सुरासुरात घुमले मधूरगाण कोकिळे,
नसानसात भिनले सूर तेचि भावले
अलौकिक गीत तुझे हृदयी गेले ठासूनी,
जनमनी भाव तुझे गोड स्वरांनी ग्रासले!!
भक्ती गीते, भावगीते सुस्वरांनी ती गाईली,
जगभरात दिशांना, अमर आजी राहीली..
नावलौकिक होवूनी गानसम्राज्ञी जहाली,
स्वरलता ,लता दीदी नामे प्रभावित झाली!!
दिधला आनंद आजी गानरसिक मनाला
मधुर स्वरांच्या धुंद लहरीतूनी जनाला..
मुग्धमोहून सोडीले तव अमर गितांनी
सुप्रभाती ऐकिता त्या सुमधुर भुपाळीला!!
ऐकविली तू देशभक्ती, लोकगीते लावणी,
भुपाळी, ओवी अन् अभंग गाथा गाऊनी..
मराठी, हिंदी अशा कित्येक भाषा सुराविल्या,
छेडिला गंधार राग मारवा तो आळवूनी!!
मंजुळ कोकीळेचा, तुज दैवी गळा लाभला,
स्वरामृत गीतधारा कंठातूनी बहरला..
स्वर कन्या लाभली मंगेशकर कुंटुबाला,
स्वरसम्राज्ञी म्हणूनी भुषविले तू स्वतः ला!!
श्री रमाकांत राऊत पेण
