निसर्ग
निसर्ग
निळ्या अंबराखाली सुंदर दिसते अवनी,
जणू सजविली निसर्गाने ती नवरंगानी!!
असे निसर्ग हा गुरू आणिक चित्रकार ही,
रंग कुंचल्यानी तो चित्र रेखाटून पाही..
रमणीय शोभून दिसे अलौकिक धरनी!!
धरेवरील डोंगर दरी हिरव्या रंगाची,
पडे धार कड्यावरून शुभ्र झऱ्याची..
निसर्गाची किमया न्यारी पहावी नयनानी!!
नटे निसर्ग फुलाफळांनी श्रावण धारानी,
चिंब होवून पक्षी विहगंती निळ्या ढगातूनी..
वाऱ्यासवे झाडे डुलती सुर गाणी गावूनी!!
पहाटे प्रहरी गोड वाणीने कोकिळ बोले,
क्षितिजावरती इंद्रधनूची कमान खुले..
मध्येच मोर सृष्टी फुलवी सुंदर नाचूनी!!
