STORYMIRROR

Swati Darekar

Inspirational

4  

Swati Darekar

Inspirational

"एक मित्र ,एक वृक्ष "

"एक मित्र ,एक वृक्ष "

1 min
692

"एक मित्र, एक वृक्ष" हा वसा घेऊया

झाडे लावूया, झाडे जगवूया 

नेसवूनि हिरवा शालू वसुंधरेस

निसर्ग फुलवूया,समतोल राखूया ||१||


झाडे सदा परोपकारच करती

आपला,परका भेद न करती

गोड फळे अन् फुले देऊनी 

सर्वांवर शीतल छाया धरती ||२||


भारतीय संस्कृतीत वृक्षास मान

वृक्षांचे पूजन देवता समान

वृक्षच आहेत आपले जीवन 

पशुपक्षी अन् किटकांचे स्थान ||३||


वृक्षच आहेत आपले श्वास 

देती आॅक्सीजन,घटे प्रदुषण 

अन्न,औषधांची आहेत खाण

वसुंधरेचे अनमोल आभुषण ||४||


 झाडांशी आपले अतूट नाते

ते जगतील तर मिळेल पाणी 

नाहीतर सारे बिघडून जलचक्र

सुकतील नद्या,राहू दिनवाणी ||५||


आपण आपल्या स्वार्थापोटी

उजाड केली, मंगलमय धरती

वाढून वैश्विक तापमान आज  

 शुभ्र हिमशिखरे वितळती ||६||


निसर्ग दाखवतोय रौद्ररूप आज

वातावरणात सतत होतोय बदल

कधी सुका ,कधी ओला दुष्काळ 

जगाचा पोशिंदा झालाय हतबल ||७||

 

आता तरी आपण सावध होऊन

वृक्षसंवर्धनाचे महत्त्व जाणूया

जयंती असो वा पुण्यतिथीला

संकल्प करुया, झाडे लावूया ||८||


नुसतेच झाड लावून नाही तर 

पोटच्या लेकराप्रमाणे वाढवूया

वसुंधरेचे आभुषण तिला परत घालूया 

एक मित्र,एक वृक्ष हा वसा घेऊया ||९||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational