STORYMIRROR

Swati Darekar

Inspirational

3  

Swati Darekar

Inspirational

सोन्याचा संसार

सोन्याचा संसार

1 min
213

आपल्या दोघांचा

सोन्याचा संसार

मुले दोन हिरे

भरलेले घर ||१||


घेतो एकमेका

दोघे समजून

घराचे गोकुळ 

बनले यातुन ||२||


सासूसासर्यांचा

भक्कम आधार 

दीर नणंदेची

साथ मला फार ||३||


जावूबाई माझी

हक्काची बहीण

धावे मदतीला

नाही येत शीण ||४||


मुलेबाळे सारी

आनंदाने नांदे

साऱ्यांच्या साथीने

नाही कुठे वांदे ||५||


आपला संसार

जसा स्वर्ग धरा

गोडी गुलाबीने

फुलवू या सारा ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational