Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swati Darekar

Children

4  

Swati Darekar

Children

हसू खेळू नाचूया

हसू खेळू नाचूया

1 min
456

आज बालदिनी आपण

शपथ सारे मिळून घेऊया

बास झाले मोबाईल चाळणे

आता मैदानी खेळ खेळूया ||१||

लपाछपीचा डाव रंगेल

लपण्यास जागा शोधूया

सुरपारंब्या खेळता खेळता 

झाडावरती सरसर चढुया ||२||

खोखो खेळता खेळता 

दमून खूप जाऊया

घाम येईपर्यंत खेळून

पोट भरुन खाऊया ||३||

निसर्ग नेहमी साद देतो

त्याचेही थोडे ऐकूया

कधी पक्षासारखे उडून 

सुंदर पृथ्वीला पाहूया ||४||

बालपण छान घालवू

फुलपाखरासंगे बागडूया

फुलांचे रंग डोळ्यात भरून

मोराबरोबर ताल धरूया ||५||

चला मुलांनो यारे सारे

निसर्गात रममान होऊया

कधी मैदानी खेळ तर कधी 

हसू खेळू नाचूया ||६||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Children