ज्ञान साधक विद्यार्थी (अष्टाक्षरी)
ज्ञान साधक विद्यार्थी (अष्टाक्षरी)
ज्ञान साधक विद्यार्थी
ज्ञानार्जन करतात
ज्ञान हेच व्रत सदा
जीवनात पाळतात....१
गुरु शिष्य परंपरा
जिद्द शिकण्याची ठेवा
काळ कठीण असला
तरी धीर न सोडावा....२
बोट गुरुंचे धरून
मिळे जिवना आकार
ज्ञान साधना करून
स्वप्न होतात साकार....३
क्षेत्र ज्ञानाचे हे मोठे
ज्ञान कक्षा रुंदावती
लोक होतात प्रेरीत
मिळे यश आणि कीर्ती....४
ज्ञान अमृतासमान
करे विद्यार्थी प्राशन
अति गुणवान शिष्य
वाढे देशाचीही शान....५
विश्व विद्यार्थी दिवस
आठवण कलामांची
गुणवान महामेरु
साठवण आदर्शांची....६
