STORYMIRROR

Swati Darekar

Inspirational

3  

Swati Darekar

Inspirational

"आली माझ्या घरी ही दिवाळी "

"आली माझ्या घरी ही दिवाळी "

1 min
335

दिपवून टाकणार्‍या प्रकाशाने

सप्तरंगात न्हाऊन निघाली 

तिमिरातून तेजाकडे नेणारी

आली माझ्या घरी ही दिवाळी ...१


शरद ऋतूच्या मध्यभागी 

दिवाळसण हा येतो मोठा

मौजमजा अन् उत्साहाला

दिवाळीत नसे कशाचा तोटा.....२


रंगात रंगलेल्या रांगोळीने

सजते घर आणि अंगण

अंधाराला दूर सारण्या

येतो प्रकाशमय दिवाळसण....३


स्वागता दारी लावले तोरण

आकाशकंदील ही जगमगला

लक्ष लक्ष आरास दिव्यांची

आसमंत सारा उजळला......४


पहिली अंघोळ अभ्यंगस्नान 

उटण्याचा सुगंध दरवळे मनात 

आकाशीचे तारे येती धरतीवर

आनंद साजरा प्रत्येक घरात ....५


लाडू, चिवडा, चकली, करंजी

रुचकर फराळाचा घमघमाट 

वसूबारसला नेवैद्य गाईला

भाऊबीजेचा प्रेमळ थाट.....६


पाच दिवस दिवाळी येते

सुखदुःखाच्या पलीकडे नेते 

सोनपावलांनी लक्ष्मी येते

आशिष सुख समृद्धीचा देते.....७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational