STORYMIRROR

Swati Darekar

Inspirational

4  

Swati Darekar

Inspirational

आधारवड

आधारवड

1 min
741

ज्यांना मिळतो आशीर्वाद 

देवस्वरुप आईवडीलांचा

पुण्य लाभते संचिताचे 

मिळे आधार ज्येष्ठांचा ||१||


ते असतात आपले आधारवड

अनुभवांची असते खाण

रीतीभाती, सोवळे, ओवळे

उपाय असतो रामबाण ||२||


वडीलधारे असता सोबत

संकटात हत्तीचे बळ

प्रेम, माया, ममतेने

लाभते सहवासाचे फळ ||३||


ज्येष्ठ असता आसपास 

नित्य खुले राहते दार

अखंड नंदादीप तेवतो

संस्कारात नांदते घर ||४||


ज्येष्ठ असतात दुवा 

दोन पिढ्यांना सांधणारा 

पूल असतो ज्ञानाचा

भूत, भविष्याला बांधणारा ||५||


थोरामोठ्यांची साथ

हीच तर खरी पुण्याई 

वडीलधारे आपल्यासाठी

साक्षात विठ्ठल रखुमाई ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational