Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swati Darekar

Others

4.0  

Swati Darekar

Others

भाऊ माझा पाठीराखा

भाऊ माझा पाठीराखा

1 min
358


भावा बहिणीचे नाते

स्वर्गातच बनलेले

रेशमाच्या धाग्यामध्ये

प्रेमभावे गुंफलेले ||१||


ऐश्वर्यात लोळते मी

माझ्या सासरच्या घरी

तरी ओढ घेई मन

कसे माहेरच्या दारी ||२||


भाऊ माझा पाठीराखा

मला भक्कम आधार

हाक बहिणीची येता

करी संकटांना पार ||३||


आईसम माया करी

फुटे प्रेमाचा पाझर

बाबांचेच प्रतिबिंब 

दिसे त्याच्या मुखावर ||४||


ओवाळते भाऊराया

प्रंचप्राण घेते ताटी

देते आशीष सौख्याचा 

भरी वहिणीची ओटी ||५||


नको बहिणीस काही 

साडी, चोळी जरतारी

भाऊ दीर्घायुषी व्हावा

विनवणी देवा करी ||६||


Rate this content
Log in