प्रदूषण
प्रदूषण
1 min
377
प्रदूषण
चहूकडे
श्वास व्याधी
वाढे गडे ...१
जल, हवा
प्रदूषित
पशू, पक्षी
कष्टातीत...२
वाढ झाली
हव्यासात
मोठे वृक्ष
तोडण्यात...३
इंधनाचा
काळा धूर
सृष्टीसाठी
भस्मासूर ...४
ऋतुचक्र
बिघडले
विष वायू
पसरले....५
समतोल
बिघडला
कर्ब वायू
बळावला.. ६
वृक्ष तोड
थांबवूया
वसूंधरा
वाचवूया... ७
नद्या,नाले
स्वच्छ करु
योग्य मार्ग
पुन्हा धरु...८
दूर करु
प्रदूषण
देऊ धरा
आभुषण... ९
