STORYMIRROR

Swati Darekar

Children

3  

Swati Darekar

Children

वाघाची मावशी

वाघाची मावशी

1 min
351

इवलीशी मनीमाऊ 

गोरी गोरी पान 

घारे घारे डोळे तिचे

इवलेसे कान ||१||


शेपटीचा गोंडा हलवत

उंदराची चाहूल घेते

भूक लागताच आईच्या 

पायाशी घुटमळते ||२||


इकडून तिकडे धावते

लुटू लुटू लुटू 

डोळे मिटून दूध पिते

चुटू चुटू चुटू ||३||


बसायला आवडतो तिला

स्वयंपाकाचा कट्टा

उंदीर, झुरळ, पालींचा

करते पार चट्टामट्टा ||४||


चिंगी आणि गोटयाशी

लपाछपी खेळते 

चोरपावलांनी जाऊन

मोत्याची खोडी काढते ||५||


इवलीशी मनीमाऊ 

आहे वाघाची मावशी

बहिणीला भेटायला 

जाईल म्हणे एकादिवशी ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children