फुलली गुलाबकळी (चाराक्षरी काव्य)
फुलली गुलाबकळी (चाराक्षरी काव्य)
फुले कळी
गुलाबाची
वाढे शोभा
अंगणाची !!
पाहताच
पुष्पकळी
गालामध्ये
पडे खळी !!
पुष्पराजा
हा फुलांचा
भिन्न भिन्न
प्रकारांचा !!
पूजास्थानी
याला मान
नारी केशा
दिसे छान !!
पुराणात
देवपुष्प
नेहरूंचे
प्रिय पुष्प !!
गुलकंद
पाकळ्यांचा
आवडता
हा सर्वांचा !!
पुष्पजल
गुणकारी
नाना व्याधी
दूर करी !!
काट्यांमध्ये
फुलण्याचा
गंध चहू
वाटण्याचा !!
शिकवण
गुलाबाची
साठवण
आयुष्याची !!
