नवदुर्गा
नवदुर्गा
" नवदुर्गा "ची नऊ रूपे
1.शैलपुत्री 2.ब्रह्मचारिणी 3.चन्द्रघण्टा
4. कूष्माण्डा 5.स्कन्दमाता 6.कात्यायनी
7.कालरात्रि 8.महागौरी 9.सिद्धिदात्री
नवदुर्गेचे अवतार नऊ
प्रत्येक रुपाची महिमा गाऊ
मनोभावे करुनी पूजन
डोळे भरून देवीला पाहू .....१
पहिले रुप शैलपुत्री
विश्वाची माता पार्वती
स्तवन करता देवीचे
मिळे साधकास मनःशांती ....२
ब्रम्हचारिणी रुप दुसरे
मन स्वाधिष्ठान चक्रात ज्यांचे
अनंत फळे देती देवी
मन धाडसी होई साधकांचे....३
चंद्रघंटा अवतार तिसरा
मस्तकी चंद्र, हाती तलवार
दस भुजाधारी ,संकट निवारी
मुद्रा तिची युध्दासाठी तयार ....४
चौथा अवतार कूष्मांडा
अस्तित्वाची निदर्शक आई
समस्त विश्व सामावलेली
निर्मितीची ऊर्जा देई .....५
पाचवा अवतार स्कंदमाता
असे कार्तिकेयची आई
करुणेची मुर्ती साक्षात
शौर्य, करुना भक्तात येई.....६
कात्यायनी प्रतिक मातृत्वाचे
गुण तिचे निगा, संगोपन
योग्य वर मिळण्यासाठी
कुमारिका करिते पूजन......७
सातवे रुप कालरात्री
विश्व सामावले काळात
रात्री देह घेतो विश्रांती घेतो
सकाळी सर्व ताजे दिसतात... ८
आठवा अवतार महागौरी
प्रतिक असे शुद्धतेचे
निरानसता तिच्या ठायी
गौरवर्णी रंगरुप देवीचे.....९
सिद्धी देणारी सिद्धीदात्री
ईच्छापूर्ती होई साधकाची
प्राविण्य आणि मुक्ती मिळे
करुनी उपासना देवीची....१०
