म्हणूनच माझा महाराष्ट्र महान..
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान..
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।।ध्रु. ।।
भगवा इथल्या रक्तांत आहे
शिवबा इथल्या भक्तांत आहे
तीर्थ इथल्या नद्यांत वाहते
समृद्धी इथल्या खोऱ्यांत राहते
मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।। १ ।।
संतमहात्मे नि शूरवीर
समाजसुधारक नि क्रांतीवीर
जन्मले मायभूमीच्या रक्षणासाठी
लेकरे सारी तुझीच मराठी
गौरवशाली परंपरा भारताची शान
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।। २ ।।
इतिहासाचा घेउनि वारसा
पाहतो अभिजाततेचा आरसा
सदैव पाउल पडते पुढे
किर्ती दाही दिशांना भिडे
एकमुखाने गाऊया गुणगान
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।। ३ ।
