छत्रपती सर्जा शंभु 🗡
छत्रपती सर्जा शंभु 🗡
फाटतो मराठ्यांचा उर..
दाटतो नभा फितुरीचा काळाकुट्ट धूर रक्तात
सळसळे तुझे नाव घेताच फाटती नसा..
झकते दुनिया ज्या चरणी तो वीर असेल
कसा गर्जतो सह्यांद्रि ज्याच्या जोशाने..
उफानते ईंद्रायणी त्याच त्वेशाने बलदंड बाहु पहाडी
काया..
झुंजला छाव्या सारखा शंभुराया..
छत्रपति पुत्र सर्वशक्तिमान तू स्वराज्य सूर्यासमान तू..
गर्वाने फडकते भगवे निशाण तू मराठ्यांचा सार्थ
अभिमान तू..
डौल तुझा वाघाचा दंश अस्सल नागाचा पेट घेतो समुद्र
__ आज हि..
जंजिरा वाट तुझीच पाहि कंठ दाटून येतो रे स्वराज्य
वेड्या तुझ्या हातातल्या टोचतात लोखंडी बेड्या..
आमच्यासाठी तु किती सोसल तुझच शौर्य त्या
ईतिहासाला
का टोचल रडतात मराठे दिवस तुझे अठवुण
जातात आश्रू डोळ्यातले डोळ्यात आटून..
गाठली तूच रे पराक्रमाची सीमा करुन
गेला पिढ्यान पिढ्याचे अमर आम्हा..
माझ्या शंभुच्या बलिदानाने कुणा
कुणाचा स्वाभिमान भडकतो..
छातीवर हात ठेवून सांगा मराठ्यांनो
तुमच्या काळजात कोण धडकतो..
छत्रपति सर्जा शंभू महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ।
