विषय डॉ.किरण बेदी
विषय डॉ.किरण बेदी
धडाडी काय असते
याचे जिवंत उदाहरण
आयपीएस अधिकारी
पहिल्या त्या डॉ. किरण ||
देऊनी संघर्षांना तोंड
असे चिकाटी, जिद्द फार
केले लोकाभिमुख कार्य
महानिरीक्षक तुरुंग तीहार ||
घेऊनी राज्यशास्त्राची पदवी
समाजशास्त्रात पीएचडी केली
घेऊनी प्रशिक्षण अधिकारी
पोलीस दलात दाखल झाली ||
वागणुकीने त्यांच्या केला
कैद्यांचा विश्वास संपादन
तक्रारींना देऊनी त्यांनी दाद
सुरू अभ्यास वर्ग दूरदर्शन ||
सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध
'शांतता पुरस्काराने 'अर्पिले
अनेक पुरस्काराने सन्मानित
'मदर टेरेसा' अवार्ड मिळाले||
संवेदनशील मनाच्या बेदी
तडफदार खंबीर असे वट
प्रामाणिकपणे केलेल काम
त्यांना माझा मानाचा सल्यूट ||
