सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ असे अनाथांची आई
मुले बाराशे दत्तक म्हणे प्रेमाने ते माई
झाला जन्म गरिबीत घाले कपडे चिंध्याचे
कमी वयात विवाह दार बंद शिक्षणाचे
खूप कठीण जीवन केला सामना जिद्दीने
नाही गमावली आशा लढा दिला हिमतीने
चारित्र्याच्या संशयाने घर,गाव सोडविले
एका गाईच्या गोठ्यात सुकन्येस जन्म दिले
रात्र स्मशानभूमीत अब्रू वाचवण्यासाठी
अनाथांना छत्रछाया माया ही अनेकांपाठी
परिश्रम करुनिया त्यांनी आश्रम बांधले
कितीतरी आश्रितांनी उच्च शिक्षण घेतले
पैशापायी कुणापुढे नाही पसरले हात
अंगी स्वावलंबनाची जळे अखंडित वात
