स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
"विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा उंचा रहे हमारा"
मातृभूमी ही अजिंक्य विश्वात
सार्या वंद्य संस्कृती
कणकण मातीचा बोले हर्षे
विश्वास प्रेम इथें नांदती
किती आक्रोश झाला
वाहल्या रक्तांच्या इथे नद्या
वीरांनी वीरमरण पत्करले
देशालाच आपला दागिना
मानून विवाहितेने
आपले सौभाग्य पणाला लावले
इच्छा-आकांक्षा दूर सारून
नाही जुमानला ऊन पाऊस वारा
वीर शिवाजी, प्रताप, बाजी थोर
आमचा इतिहास हा सारा
बलिदानाने त्यांच्या स्वातंत्र्यदिन
खरा उदयास आला
संपन्न इतिहास युवकात होती
प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
कित्येक वर्षाच्या गुलामगिरी नंतर
स्वातंत्र्य सूय॔ उगवला
तिरंगा लाल किल्ल्यावर फडकला
म्हणून स्वातंत्र्य म्हणजे काय तर..?
चाळाव इतिहासाच्या पानांना
शौर्यांच्या कथा दिसतील धारा लागतील डोळ्यांना
स्वातंत्र्य मिळाले ज्यांच्यामुळे
सदैव ज्ञात असावे ते
महान समाजसुधारक अन् क्रांतिकारक ..
स्वातंत्र्य म्हणजे काय तर....
वापरावेत शब्द
प्रामाणिक करावा सर्वांच्या भावनांचा आदर
स्वातंत्र्य म्हणजे काय तर
अंगी असावा नेहमी सदाचार
कधी न दाखवावा समाजात अनाचार
अंगीकारावा अनुशासन आणि शिष्टाचार
स्वातंत्र्य म्हणजे काय तर
ना करावी निंदा कुणाची ना ऐकावी
स्वतःच्या अवगुणाला बघून दुसरयाचे गुण निवडावे नेहमी
स्वातंत्र्य म्हणजे काय तर...
मुक्ती, हक्क, जबाबदारी जाणिवांचा संगम
स्वातंत्र म्हणजे लोकशाहीचा आत्मा
तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी
किरण शलाखाचा उगम
स्वातंत्र्य म्हणजे परिस्थितीच्या ताब्यातून
किंवा हस्तक्षेपातून झालेली मुक्ती
स्वातंत्र्य म्हणजे समाजहित जपून
देशातील सर्वांच्या विकासाला मिळालेली एक सुवर्णसंधी
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे..?
हे कधी कळणार तरुण पिढीला देव जाणे..?
कळावा आता तरी...
सगळ्यांना "स्वातंत्र्य" या शब्दाचा अर्थ
दारिद्र्याच्या बेड्या तोडून
परंपरेच्या जंजाळातून आतातरी आहे बाहेर पडायचं ..?
पुन्हा एकदा भ्रष्टाचारी, देशद्रोही व्यक्तींना
मतदानातून चलेजाव म्हणायचं..
संविधानाने दिलेलं "स्वातंत्र्य" म्हणजे नक्की काय...?
ते खर्या अर्थाने समजून उपभोगायचं
अन् मातृभूमीप्रती देशभक्तीच्या
साऱ्या भावनांना हृदयात साठवायचं ....
शक्य असल्यास कधीतरी आपल्या देशाप्रती
कर्तव्यतत्पर राहायचं...
