STORYMIRROR

PALLAVI CHAVANo km km lol it

Inspirational

4  

PALLAVI CHAVANo km km lol it

Inspirational

वंशाची पणती

वंशाची पणती

1 min
306

नका खुडू असे गर्भातच मला,

उघडया डोळयांनी जग पाहू दया,

वंशाच्या दिवाच्या बरोबरीनेच,

पणतीलाही श्वास घेवू दया॥१॥


कधी समजणार आई बाबा,

आपल्याच पोटचा गोळा मी,

उच्च शिक्षण घेवूनी तव,

तुमचेच नाव रोशन करणार मी॥२॥


दादासारखा हट्ट न करता,

आहे त्यात समाधान मानेन,

खाऊ, खेळणी नकोत मज,

मायेच्या पंखाखाली मी झोपेन॥३॥


जिजाऊ, सावित्री, रमाईसम,

इतिहास दैदिप्यमान करेन,

कर्तृत्व माझे सिद्ध करुनी,

स्त्रीजातीचा नावलौकिक वाढवेन॥४॥


आजच्या युगाची नारी होवूनी,

हिंमतीने स्वसंरक्षण करेन मी,

हाती तळपती तलवार घेवूनी,

अन्यायाला वाचा फोडेन मी ॥५॥


दोन्ही घरचा दिवा होवूनी,

प्रकाशाने घर उजळेन मी,

पोटी कन्यारत्न प्राप्त झाल्याचा,

सार्थ अभिमान मिळवून देईन मी ॥६॥


म्हातारपणाची काठी अन्,

आपले आधारस्तंभ होईन मी,

आनंद, चैतन्य लक्ष्मीच्या पावलाने,

संपूर्ण जीवन उजळवेन मी ॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational