मी मराठी शाळा बोलते
मी मराठी शाळा बोलते
*ओळखलंत का मुलींनो मला,*
*मी मराठी शाळा बोलते*॥ धृ॥
कोरोनाने या केलाय कहर,
गतवर्षीपासून हरवलाय चिमुकल्यांचा सूर,
ना धिंगाना, ना दंगा, ना मस्ती,
ना गुरूजनांचा धाक ना फटकार,
माझे अस्तित्वच मी विसरते ॥१॥
शाळा भरताच प्रार्थनेन
बाई व मुलांच्या सुमधुर आवाजान,
वातावरण होई मंत्रमुग्ध छान,
विसरत होते मी देहभान,
अशी सुंदर सकाळ मी परत कधी अनुभवते ॥२॥
काय सांगु पहिल्या तासाच्या गमती,
बाईंसोबत मराठी कवितेच्या कृती,
नाट्यीकरणात वेशभूषेच्या गमती,
डायलॉग मारता मारता मुलीही दमती,
पुन्हा कधी माझ्यात फिल्मसिटी भरते ॥३॥
फळा अन् पाटीही रुसली,
तुमच्याविना बाळांनो मी ही हिरमुसली,
लर्निंग फ्रॉम होम च्या नवीन फॅडात
माझी लेकरं वाचन, लेखनच विसरली,
तुमच्यावर संस्कार कशी मी करू शकते ॥४॥
ना सुप्त कलागुणांचा विकास,
गणिताचा आकडेमोड ना इंग्रजीचे उच्चार,
सवंगडयासह खेळ ना मनसोक्त गप्पा,
मनांत कोण पेरी तुमच्या नेत्यांचे विचार,
शास्रज्ञ घडविण्या पुन्हा कधी प्रयोग शाळेत रमते॥५॥
नका घाबरू माझ्या पाखरांनो,
कोरोनाचे नियम काटेकोर पाळा,
धैर्याने महामारीवर मात करा,
अन् या शैक्षणिक वर्षी भरू दे शाळा,
पुन्हा मी जोमाने वाट तुमची बघते ॥६॥
